भारतातच नाही तर जगभरात सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरील असंख्य खाती बनावट असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे बनावट खात्यांची समोर आलेली संख्या खरी असल्याचे फेसबुकने स्वत:ही कबूल केले आहे. एका संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार, समोर आलेल्या आकडेवारीपेक्षा कित्येक पटींनी ही आकडेवारी जास्त असल्याचे समोर आले आहे. मात्र इतकी बनावट खाती कशी काय? ती कोणी काढली आणि त्याचे पुढे काय होणार याबाबत मात्र अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. निवडणुकीच्या प्रक्रियेनंतर फेसबुकने राजकीय जाहिराती पारदर्शक बनविण्याचे वचन दिले होते. या बनावट खात्यांच्यामार्फत चुकीची कामे केली जात असल्याचाही संशय आहे. सध्या फेसबुकचे २०७ कोटी यूजर्स असण्याची शक्यता आहे. त्यातील जवळपास २७ कोटी बनावट असण्याची शक्यता आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews